PuneNewsUpdate : वीट भट्टी मालकाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा आणि त्याच्या मित्राचा खून , ६ जण गजाआड

पुणे : चाकणमध्ये प्रेमप्रकरणामधून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्येच या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.बाळू सीताराम गावडे आणि राहुल दत्तात्रय गावडे अशी मृत तरुणांची नवे आहेत. ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याविषयीची अधिक माहिती कि , बाळू हा एका वीटभट्टीवर कामाला होता. या वीटभट्टीच्या मालकाची मुलगी १४ तारखेला बाळूसोबत बळून गेली. मालकाची मुलगी पळवून नेण्यासाठी बाळूला राहुलने मदत केली. यानंतर विटभट्टी मालकाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन दिवस शोध घेत या तिघांना शोधून काढले. गुरुवारी या तिघांचा शोध लागल्यानंतर त्यांना विटभट्टी मालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने लाकडी दांडके, लोखंडी रॉर्ड्सने या दोघांना बेदम मारहाण केली. याच मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. बाळूसोबत पळून गेलेल्या मुलीलाही मारहाण करण्यात आली आहे. ही मुलगीही जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
मयत बाळू सीताराम गावडेचा विवाह झालेला असून या दुहेरी हत्याकांड प्रकरणात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या मुलीच्या वडिलांसहीत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या सहा जणांना ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. नक्की घटनाक्रम कसा घडला यासंदर्भातील तपासही पोलीस करत आहेत.