Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : मुंबई , औरंगाबादेत व्हिडीओकॉनवर ईडीचे छापे , धूत कुटुंबियांवर कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : आयसीआयसीआय बँकेशी संबंधित कर्ज प्रकरणात व्हिडिओकॉन समूहाचे मालक राजकुमार धूत आणि वेणूगोपाल धूत हे धूत बंधू ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. याच प्रकरणात व्हिडिओकॉन समूहावर सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई सुरू केली असून व्हिडिओकॉनचे मालक वेणूगोपाल धूत आणि राजकुमार धूत यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घर व कार्यालयांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले  असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

दरम्यान आयसीआयसीआय बँकेशी संबंधित कर्ज प्रकरण आणि परदेशातील तेल तसेच, नैसर्गिक वायू उत्खनन आणि विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. उपलब्ध  माहितीनुसार, ईडीच्या विशेष  पथकाने मुंबईत मलबार हिल आणि गोवंडी भागात छापे टाकले असून अशाच प्रकारचे छापे औरंगाबाद येथेही टाकण्यात आले आहेत. या कारवाईबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

Advertisements
Advertisements

या  प्रकरणाची अधिक माहिती कि , २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेने धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची या कर्जपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका राहिली होती, असा आरोप आहे. या कर्ज प्रकरणाच्या बदल्यात व्हिडिओकॉन समूहाने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवले होते. ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली होती, असाही आरोप आहे. या प्रकरणात चंदा कोचर, व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि अन्य काही जणांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत एफआयआरही दाखल झालेला आहे. याच प्रकरणात दीपक कोचर यांना अटकही करण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!