NashikNewsUpdate : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला १० वर्षाची शिक्षा

नाशिक : बसची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याचा बहाणा करत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी तरुणाला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी तरुंगवासात आणखी तीन महिन्यांची वाढ केली जाईल, असेही न्यायालयानं निकालपत्रात म्हटलं आहे.
सागर दिलीप भोये असे शिक्षा झालेल्या दोषी तरुणाचं नाव आहे. आरोपीने ४ वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबर २०१७ रोजी दिंडोरी तालुक्यातील मांदाने याठिकाणी तरुणीला आपल्या घरी नेऊन बलात्कार केला होता. बलात्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पीडिते मुलीने वनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी सागर विरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.