MaharashtraNewsUpdate : अनिल देशमुख यांना नक्कीच अटक होईल अन्यथा ते पुरावे नष्ट करतील : अॅड. जयश्री पाटील

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आपण सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिले असून अनिल देशमुख यांना नक्कीच अटक होईल, अशी प्रतिक्रिया अॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना यापूर्वीच अटक झालेली आहे. आता ईडीने देशमुख यांना बोलावले आहे. माझ्या देशाच्या राज्यघटनेवर आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यांना अटक झाली नाही तर ते पुरावे नष्ट करतील असेही जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.
प्रसार माध्यमंही बोलताना अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या कि अनिल देशमुख यांना अटक होईल असा मला विश्वास असून ईडीने केलेल्या कारवाईवर मी समाधानी आहे. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा हा माझ्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार दाखल केला आहे. ईडीने देखील माझ्या तक्रारीवरच माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केलेली आहे, असे अॅड पाटील म्हणाल्या.
अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराने जे लोक पिळले गेले आहेत अशा पीडित लोकांची माहिती आपण ईडीला दिली असून त्यांना जर अटक केली गेली नाही, तर ते पुरावे नष्ट करु शकतात, असे सांगून अॅड. पाटील पुढे म्हणाल्या कि, अँटिलिया स्फोटके प्रकरणा डीवीआर अजून सापडलेला नाही. अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना ईडीने नुकतीच अटक केलेली आहे. या कारवाईनंतर ईडीने अनिल देशमुख यांनाही कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल, असे अॅड. पाटील यांनी म्हटले आहे.
धमकीचे फोन आले. माझ्यावर दबाव टाकण्यात आला.
या प्रकरणापासून दूर होण्यासाठी मला धमकीचे फोन आले. माझ्यावर दबाव टाकण्यात आला. त्याचे सगळे पुरावे देखील मी दिले आहेत. या दबाव टाकण्याच्या प्रकरणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी माझ्यावर कशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याबाबत सविस्तर माहिती मी ईडीला दिलेली आहे. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुख यांच्यावर शरद पवार यांचा हात असला तरी त्यांना अटक होईल, असा दावा पाटील यांनी केला आहे. दरम्यान अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले आहे हे ऐकून मी अतिशय आनंदी आहे. त्यांना या प्रकरणात अटक होऊन त्यांना शिक्षा होईल असे मला वाटते, असेही त्या शेवटी म्हणाल्या.