CoronaIndiaUpdate : देशात गेल्या २४ तासांत ५०,०४० नवे रुग्ण , ५,८६,४०३ सक्रिय रुग्ण

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ५०,०४० रुग्णांची भर पडली आहे तर १२५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी दरात वाढ झाली असून तो ९६.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात अजूनही ५, ८६, ४०३ सक्रिय रुग्ण आहेत. त्या आधी एक दिवस म्हणजे शनिवारी देशात ४८६९८ रुग्णांची भर पडली होती तर ११८३ लोकांचा मृत्यू झाला होता. काल एका दिवसात ६४ लाख २५ हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण ३२ कोटी १७ लाखाहून जास्त कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत.
देश एका नजर
एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी दोन लाख ३३ हजार १८३
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी ९५ लाख ५१ हजार ०२९
एकूण सक्रिय रुग्ण : पाच लाख ६८ हजार ४०३
एकूण मृत्यू : तीन लाख ९५ हजार ७५१
महाराष्ट्रातील एक नजर
राज्यातील २४ तासातील रुग्ण : ९८१२
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण : ८७५२
बरे होणाऱ्यांची संख्या : ५७८१५५१
मृत्यूची संख्या : १७९। मृत्यूदर २ टक्के
सक्रिय रुग्णांची संख्या : १,२१,१५१