IndiaNewsUpdate : बापरे !! मास्क घातला नाही म्हणून थेट गोळीच घातली …!!

मुंबई : उत्तर प्रदेशातल्या बरेलीत मास्क लावला नाही म्हणून प्रचंड धक्कादायक घटना घडली आहे. मास्क न लावता बँकेत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला बँकेच्या सिक्युरिटी गार्डने अडविले आणि … मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली. त्यावरुन दोघांमध्ये भांडण सुरू झाले . हे भांडण एवढ्या टोकाला गेले की सिक्युरिटी गार्डने थेट त्याच्या पायावर गोळीच घातली. याप्रकरणी सिक्युरिटी गार्ड केशवला अटक करण्यात आली आहे. तर जखमीवर उपचार सुरू आहेत.
त्याचे असे झाले कि , शुक्रवारी बरेली जिल्ह्यात फेस मास्क न घातलेल्या व्यक्तीवर एका २८ वर्षांच्या ग्राहकाला गोळीबार केल्याच्या आरोपाखाली एका बँकेच्या सुरक्षारक्षकास अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तथापि, सुरक्षारक्षक केशव म्हणाला की, त्याने बँक आवारात भांडणाच्या वेळी राजेश कुमारवर चुकून गोळीबार केला.
रुग्णालयात दाखल केलेल्या राजेशची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. बरेलीचे एसएसपी रोहितसिंह सजवान म्हणाले की केशवला अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येणार आहे. सजन म्हणाले की, “तक्रारीनंतर आम्ही गार्डविरुद्ध आयपीसी कलम ३०७(खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर मंडल अधिकारी (शहर -१) यतेंद्रसिंह नगर म्हणाले, “गुडघ्याच्या अगदी वरच्या बाजूला डाव्या मांडीवर गोळ्या घालण्यात आल्या. जखमींची प्रकृती बरी आहे. ”