CoronaIndiaUpdate : देशातील सक्रिय रुग्णांची संख्या उतरणीकडे, रिकव्हरी रेट वाढून ९६.१६ टक्क्यांवर !!

नवी दिल्ली : देशात सक्रिय रुग्णांची’ संख्या तब्बल ७४ दिवसांनंतर कमी झाली झाली असून कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून ९६.१६ टक्क्यांवर आला आहे. तर देशाचा एका दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट २.९८ टक्क्यांवर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १६४७ जणांचा मृत्यू झाला असून शुक्रवारी ९७ हजार ७४३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
दरम्यान देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९८ लाख २३ हजार ५४६ वर पोहचली आहे. देशात आत्तापर्यंत २ कोटी ८६ लाख ७८ हजार ३९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ७ लाख ६० हजार ०१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ८५ हजार १३७ वर पोहचली आहे.