kolhapurNewsUpdateLive : मराठा आंदोलन लाइव्ह अपडेट्स : आंदोलनाला प्रारंभ , प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी होत आहेत सभागी …

उपस्थित लोकप्रतिनिधींची भाषणे सुरु आहेत
जनसुराज्य पार्टीचे आ. विनय कोरे बोलत आहेत
लोकप्रतिनिधींच्या भाषणाला प्रारंभ
श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह सर्व कुटुंबीयांचा आंदोलनात सहभाग
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातील मूक मोर्चात सहभागी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातील आंदोलन स्थळी दाखल झाले आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या मूक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ते कोल्हापुरात पोहोचले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा समाजाच्या मूक मोर्चात सहभागी झाले आहेत. “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना पाठिंबा देणार, आज कोल्हापूरचा नागरिक आंदोलनात सहभागी झालो आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचे आंदोलन : संभाजीराजे
खासदार संभाजीराजे छत्रपती आपल्या निवासस्थानाहून आंदोलनस्थळी रवाना झाले आहे. “मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील, मराठा समाज दु:खी आहे. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी लागणार
सकाळपासून कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने छत्री घेऊन आंदोलक शाहू समाधी स्थळाकडे
खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुकारण्यात आलेल्या मूक आंदोलनाला आज कोल्हापुरातून सुरुवात
सकाळा दहा वाजल्यापासून सुरू झाले आंदोलन