AccidentNewsUpdate : जालना : तिहेरी अपघातात १ ठार, ५ जखमी , लहान बालक गंभीर

जालना : जालन्यातील अंबड चौफुलीनजीक रस्त्यावर उभ्या असलेला ट्रकला नांदेडकडे जाणारा बिटको ट्रान्सपोर्टचा आयशर ट्रक जाऊन धडकला. त्यानंतर याच ट्रकवर कार येऊन धडकली. या तिहेरी अपघातात कारमधील एक जण ठार तर ५ जण जखमी झाले असून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला असल्याचे वृत्त आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , नाशिकहुन नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकचे (क्र. एम.एच 15 सी.के 1555) टायर फुटल्यामुळे ट्रक चालक रस्त्याच्या बाजूला टायर बदलत होता. दरम्यान याचवेळी औरंगाबाद येथून नांदेडकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम.एच 20 ई.एल 1265 हा उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकला. यामध्ये ट्रकच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असले तरी आयशर चालक उत्तम पाटोळे हा किरकोळ जखमी झाला.
दरम्यान याच वाहनांवर पहाटे पाच वाजेच्या सुमारास आणखी एका करणे (क्रमांक एम.एच 15 टी.व्ही 1404 ) ट्रकला पाठीमागील बाजूने धडक दिली. सदर कार नाशिक येथून सिंदखेड राजा तालुक्यात असलेल्या खैरखेडाकडे जात होती. यामध्ये किरण संजय धोंडगे (रा. खैरखेडा, ता. सिंदखेड राजा) हे जागीच ठार झाले आहेत. किरण संजय धोंडगे व मंठा तालुक्यातील खाडे या दोघांनी हि कार बुक केली होती. खाडे यांना मंठा येथे सोडून कार चालक गजानन मोरे हा धोंडगे यांना सोडण्यासाठी खैरखेडा येथे जाणार होता. त्यातच हा अपघात घडला.
या अपघाताच्यावेळी कारमध्ये असलेले विनोद आसाराम खाडे 28, रेशमा विनोद खाडे 26, आयुष विनोद काळे 7, किरकोळ जखमी झाले आहेत. तर अथर्व विनोद खाडे हा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील वाहने वेगळी करण्यासाठी आणि जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली आहे.