Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात खा. डॉ . प्रीतम मुंढे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : पुढील वर्षात होऊ घातलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळातील  फेरबदलाची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. तसेच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. दरम्यान या फेरबदलात मराठवाड्यातील खासदार डॉ. प्रीतम मुंढे यांचे नावही मंत्रिपदाच्या चर्चेत असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

दरम्यान पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर  आणि  नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन ते तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आठवड्याभरात हा विस्तार होण्याची शक्यता असून  महाराष्ट्र राज्यातून डॉ. प्रीतम मुंढे यांचंही नाव आघाडीवर आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याही नावाची चर्चा असल्याचे वृत्त आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!