Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जगातील सर्वात मोठ्या कुटुंबीयांचा कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड

Spread the love

मिझोराम : जगातील सर्वात मोठ्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; ३८ पत्नी विधवा तर ८९ मुलं पोरकी झाली असल्याचे वृत्त आहे. जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख असणारे जिओना चाना यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले  आहे. न्यूज एजेन्सी एएनआयने  दिलेल्या माहितीनुसार, मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी ट्विट करून याबाबत माहिती समोर आणली आहे. चानाच्या कुटुंबात ३८ पत्नी, ८९ मुले  आहेत. इतकचं नाही तर हे कुटुंब एवढं मोठं होते  की, मिझोरममध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ते आकर्षिक केंद्र होते .

मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून माहिती देताना म्हटले आहे की, चाना यांच्यामुळे मिझोरम आणि बकटावंग तलंगनुम हे त्यांचे गाव राज्याच्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण होतं. जिओना यांच्या कुटुंबातील महिला शेती करत होत्या आणि घर चालवण्यासाठी योगदान देत होत्या. जिओनाची सर्वात मोठी पत्नी मुख्य जबाबदारी सांभाळत होती. घरातील सर्व सदस्यांच्या कामाची आणि त्यांना वाटून दिलेल्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याचं काम त्या करत होत्या.

जिओना यांच्या निधनाने  संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे कुटुंब मिझोरमच्या सुंदर पहाडावार बकटावंग गावातील एका मोठ्या घरात राहत होतं. या घरात एकूण १०० खोल्या होत्या. जिओना यांचे सेरछिप जिल्ह्यात होतं. जिओना चाना यांचा जन्म २१ जुलै १९४५ रोजी झाला होता. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी पहिलं लग्न केले होते. त्यांची पत्नी जथियांगी वयाने त्यांच्यापेक्षा ३ वर्षाने मोठी होती. त्यांच्या कुटुंबात २०० हून अधिक लोक राहत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!