Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : जाधववाडीतील खूनी अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – दोन आठवड्यांपूर्वी जाधववाडी परिसरात एका इसमाचा डोक्यात दगड घालून खून करणार्‍या आरोपीला सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुनिल जयसिंग निंभोरे(२३) धंदा मिस्री रा.मिसारवाडी असे अटक आरोपीचे नाव आहे. याने दादाराव सांडू सोनवणे (४५) रा. सुरेवाडी जाधववाडी याच्या डोक्यात दगड घालून २०मे रोजी खून केला.

Advertisements

आरोपी सुनील निभोरे हा प्रेयसीला घेऊन २० मे रोजी जाधववाडीतील सृष्टी एजन्सीच्या छतावर गेला असता त्या ठिकाणी मयत दारु पिलेल्या अवस्थेत बसलेला होता.त्याने निभोरेच्या प्रेयसीची छेड काढल्यामुळे चिडलेल्या आरोपी निभोरेने जवळ असलेल्या सिमेंट च्या ठोकळ्याने दादाराव सोनवणेचा खून केला व निघून गेला. हा प्रकार २१मे रोजी उघडकीस आला.
खबर्‍याने पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना आरोपी निभोरे हा जाधववाडी परिसरात येणार असल्याचे सांगितल्यावर त्याला सापळारचून सिडको पोलिसांनी अटक केली. सुनिल निभोरे ने खुनाची कबुली दिली आहे. वरील कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक गिरी, पीएसआय कल्याण शेळके,पोलिस कर्मचारी नरसिंग पवार , सुभाष शेळके, विजयानंद गवळी,सुनिल भिसे, गणेश नागरे यांनी पार पाडली

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!