MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : मुंबईत काय सुरु ? काय बंद ? मुंबई महापालिकेने केले जाहीर , संभ्रम झाला दूर ….

मुंबई : राज्य सरकारने राज्याची पाच गटात विभागणी केल्यामुळे शासनाने लावलेल्या निकषानुसार कोणता जिल्हा कोणत्या गटात किंवा स्तरात येतो यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला असून त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय टास्क फोर्सशी चर्चा करून आपले गट जाहीर करीत आहेत. दरम्यान यावरून मुंबईतही मोठा गोंधळ निर्माण झाला होता त्याचा खुलासा आता झाला असून या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने आपली नियमावली जाहीर केली आहे.
काय सुरु आणि काय बंद राहील ?
शासनाच्या नियमानुसार मुंबई तिसऱ्या टप्प्यात येते त्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेन तुर्तास सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार असून इतर क्षेत्रात काय सुरु आणि काय बंद राहील ? हे पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.