Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रसिद्ध गायिका वैशाली माडे राष्ट्रवादीत

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडेने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचे अभिनंदन केले आहे.

Advertisements

वैशाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातला आहे. ही परिस्थिती बघून, वैशालीचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आज ही प्रतीक्षा संपली आहे. आज वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अखेर प्रवेश केला आहे. वैशालीचा राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात प्रवेश झाला आहे. तसेच तिची विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.वैशालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तिचं स्वागत केलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्वीट करत वैशालीला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात वैशालीला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!