IndiaNewsUpdate : मायावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह विनोद करणाऱ्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला अटक करण्याची मागणी

मुंबई : बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरुन थट्टा केल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे. रणदीप हुडाच्या या व्हिडीओमध्ये तो सोशल मीडियाबद्दल बोलत आहे. यावेळी मी तुम्हा एक ‘डर्टी ज्योक’ सांगतो असं तो समोर बसलेल्या प्रेक्षकांना बोलताना दिसत आहे. तो म्हणतो की, “मायावती दोन मुलांसह जात असतात. यावेळी एक व्यक्ती त्यांना विचारतो की, ‘ही जुळी मुलं आहेत का?’ त्यावर मायावती म्हणतात नाही, ‘एक चार वर्षांचा आहे आणि दुसरा आठ वर्षांचा.’ यानंतर रणदीप हुडा जे म्हणाला त्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यावरील रणदीप हुडाच्या आक्षेपार्ह विनोदामुळे लोकांमध्ये संताप आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपला राग व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “रणदीप हुडा हा जोक नाही. आजपर्यंत कोणत्याही पुरुष नेत्यावर थट्टा होत नाही. आणि तुम्ही एका दलित आणि मागासांच्या महिला नेत्याची अशी अश्लील थट्टा केली आहे. हे चुकीचे आहे.” तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, “तुमच्या आजूबाजूला अनेक महिला आहेत, मग तुम्ही आयर्न लेडी मायावती यांचीच थट्टा का केली?”
दरम्यान काही दिवसांपूर्वी कॉमेडियन अबीश मॅथ्यूने आपल्या एका जुन्या ट्वीटमुळे बसपाच्या प्रमुख मायावती यांची माफी मागितली होती. त्या ट्वीटमध्ये मॅथ्यूने मायावती यांच्याबाबत अपमानास्पद गोष्टी लिहिल्या होत्या.