MaharashtraNewsUpdate : केंद्राकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या ९अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती कायम, तीन औरंगाबादचे

औरंगाबाद – केंद्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयातील ९अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती कायम न्यायमूर्ती म्हणून केली आहे. या मधे औरंगाबादच्या तीन अतिरिक्त न्यायमूर्तींचा समावेश आहे.अशी माहिती केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाचेअतिरिक्त सचिव राजेंद्र कश्यप यांनी दिली आहे.
नितीन सूर्यवंशी, भालचंद्र देबडवार, मुकुंद सेवलीकर या तीन अतिरिक्त न्यायमूर्तींची औरंगाबाद खंडपीठाचे कायम न्यायधीश म्हणून नियुक्ती केली आहे.तर न्या. अविनाश घारोटे, अनिल किलोर,मिलींद जाधव, विरेंद्रसिंग बिष्ट, मुकुलिका जवळकर,सुरेंद्र तावडे, नितीन बोरकर या मुंबईतील अतिरिक्त न्यायमूर्तींना कायम न्यायमूर्ती म्हणून शिक्कामोर्तब केले.