CoronaMaharashtraUpdate : राज्यात ५२ हजार ८९८ रुग्णांना डिस्चार्ज , मृत्यूची संख्या मात्र नियंत्रणाबाहेर…

मुंबई : मंगळवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी ५२ हजार ८९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहे.
दरम्यान, एकीकडे रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना राज्यातला मृत्यूदर मात्र कमी होत नाही.आरोग्यविभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात मंगळवारी ६७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांचा आकडा ८३ हजार ७७७ इतका झाला आहे. तसेच मृत्यूदर देखील १.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
Maharashtra reports 28,438 new #COVID19 cases, 52,898 discharges and 679 deaths in the last 24 hours.
Total cases 54,33,506
Total recoveries 49,27,480
Death toll 83,777Active cases 4,19,727 pic.twitter.com/darIrnktbB
— ANI (@ANI) May 18, 2021
दरम्यान, आज राज्यात सापडलेल्या नव्या २८ हजार ४३८ करोनाबाधितांमुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता ५४ लाख ३३ हजार ५०६ इतका झाला आहे. त्यापैकी ४ लाख १९ हजार ७२७ अॅक्टिव्ह रुग्ण असून ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १५ लाख ८८ हजार ७१७ करोना चाचण्या केल्या असून त्यापैकी ५४ लाख ३३ हजार ५०६ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७.२ टक्के नोंदवण्यात आला आहे.
पुण्यात एकाच दिवसात १ हजार ०२१ नवे करोनाबाधित
दुसरीकडे पुण्यात २४ तासांत १ हजार ०२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या ४ लाख ६१ हजार ००८ इतकी झाली आहे. त्याचवेळी आज दिवसभरात पुण्यात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ७ हजार ७९५ इतका झाला आहे. २४ तासात पुण्यात २ हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत अशा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९० इतकी झाली आहे.