IndiaNewsUpdate : यूपीएससीच्या परीक्षा लांबणीवर , दहावीच्या परीक्षाही रद्द

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची चिंताजनक स्थिती लक्षात घेत या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखील २७ जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली आहे. ही परीक्षा आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
UPSC postpones June 27 civil services preliminary examination amid surge in COVID-19 cases; to be held on October 10
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2021
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते. मागील वर्षी देखील करोना संसर्गाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ३१ मे रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती, त्यानंतर या परीक्षेचे ४ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील टाकण्यात आले आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा -२०२१ आणि भारतीय वन सेवा परीक्षा -२०२१ साठी २४ मार्ज पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.
राज्यातील दहावीच्या परीक्षाही रद्द
दरम्यान, राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी परीक्षा रद्द के ल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध के ला आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षा ‘अधिकृतरित्या’ रद्द झाल्या आहेत. दहावीची परीक्षा रद्द के ल्यामुळे गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.