MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्र्यांची आज ज्याच्या मंत्रिमंडळासोबत महत्वपूर्ण बैठक

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली असून येत्या 15 मेला आता सुरू असलेल्या कडक निर्बंध नियमावली कालावधी संपत आहे. महाराष्ट्राच्या शिवाय देशात कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार यासह इतर राज्यात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र देखील साधारण मागील कालावधीमधील आकडेवारी भलेही कमी होत असली तरी आकडा 50 हजाराच्या आसपास आहे.
राज्य शासनाच्या माहितीनुसार मुंबई, पुणे,नागपूर,अमरावती, औरंगाबाद आणि सोलापूर या मोठ्या शहरात मागील महिन्याच्या तुलनेने आता रुग्ण संख्या कमी आढळत असली तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये रुग्ण संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेसमोर आणि राज्य सरकार समोर सगळ्यात मोठे आता संकट ग्रामीण महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी करणे आहे. तूर्तास तरी आता सुरू असलेल्या काळत नियमावली येत्या 15 मेपर्यंत संपणार आहेत.
गेल्या महिनाभराच्या कालावधीत शहरी भागातील रुग्ण संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागांमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आहे . त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध 30 मे पर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच लसीकरणाबाबत वय वर्ष 18 ते 44 वयोगटाला आता लस थांबवून उपलब्ध लस वय वर्ष ४५ पेक्षा अधिक असणाऱ्यांना दुसरा डोस देण्यासाठी वापरावी याबाबत सुद्धा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, मंगळवारी याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तशा स्वरूपाचे संकेत देखील दिले आहेत.