MaharashtraNewsUpdate : 71966 रुग्णांची कोरोनावर मात तर 40956 नवे रुग्ण , मृत्यूची संख्या मात्र चिंताजनक

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार ९५६ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ७१ हजार ९६६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, आज ७९३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूंचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालणारे ठरले आहे. सोमवारी राज्यात ३७ हजार ३२६ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या काही आठवड्यांतील हा सर्वात निच्चांक ठरला होता. तर आज त्यात थोडी वाढ पाहायला मिळाली आहे. दरम्यान आज तब्बल ७१ हजार ९६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आतापर्यंत ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८७.६७ टक्के इतके झाले आहे.
राज्यात आज ७९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या आजाराने ७७ हजार १९१ रुग्णांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१ लाख ७९ हजार ९२९ ( १७.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ९१ हजार ७८३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २९ हजार ९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली
राज्यातील सक्रिय अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या ५ लाख ५८ हजार ९९६ इतकी खाली आली आहे. त्यात मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतील आकडे वेगाने खाली येत आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या ९५ हजार ७३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यात ५३ हजार २० रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या ४० हजार १६२ इतकी खाली आली आहे तर ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३१ हजार ४४६ इतकी आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या २६ हजार ८०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.