MaharashtraNewsUpdate : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध ३० मे पर्यंत वाढण्याचे संकेत , ३० जूनपर्यंत बदल्यांवर बंदी

मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढविण्याचे संकेत देण्यात आहेत. त्यामुळे सध्या 15 मे पर्यंत लागू केलेला लॉकडाऊन वाढवून 30 मेपर्यंत करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती अजूनही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढविण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यामुळे आहे त्या निर्णयात कोणतीही सूट नसेल असे सांगण्यात आले आहे. आता 15 मेपर्यंत हा लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यता आहे. तोच पुढे वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकमध्ये १० दिवसाचा कडक लॉकडाऊन
नाशिकमध्ये 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहे. नाशिकमध्ये पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.12 ते 22 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी याबद्दल माहिती दिली आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहे. औद्योगिक वसाहती देखील केवळ इन हाऊस सुरू राहणार आहे. तर, जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला,दूध,किराणा दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मेडिकल कारण वगळता इतर कोणतेही कारणा शिवाय बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल पंपावर देखील केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन मिळणार आहे. भाजीपाला आणि किराणा दुकानं 10 दिवस बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी नाशिकरांना 2 दिवसांची मुभा देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांना पास बंधनकारक असणार आहे.
राज्यात ३० जूनपर्यंत बदल्यांवर बंदी
राज्य सरकारने 30 जून 2021 पर्यंत कोणत्याही अधिका-यांच्या बदल्या होणार नसल्याचा अध्यादेश काढला आहे. कोरोनाचे कारण देत सरकारने बदल्यांसंदर्भात हा अध्यादेश काढला आहे. या काळात केवळ सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे, अत्यावश्यक सेवेतील रिक्त पद भरणे, गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एत्यादी बदल्या केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रासाठी कोरोना डोकेदुखी ठरत असताना अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नये असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत सर्व मंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती. त्यानंतर सरकारने हा आदेश काढला आहे. त्यात 30 जून 2021 पर्यंत कोणत्याही विभागाच्या बदल्या करण्यात येऊ नये असे म्हटले आहे. सर्वसाधारण, अपवादात्मक परिस्थितीमुळं किंवा विशेष कारणांमुळं विनंती बदल्या करू नये असं आदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रासमोर सध्या कोरोनाचं मोठं संकट आहे. अशावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल्या केल्या जाऊ नयेत असे आदेश सचिव आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान सेवानिवृत्तीमुळं रिक्त झालेली पदं, अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदं भरणे तसेच एखाद्यावर गंभीर स्वरूपाची तक्रार झाल्यानंतर चौकशीअंती कारवाई म्हणून बदली केल्यास रिक्त झालेल्या जागांवर नेमणुकीसाठी मात्र बदली करता येणार आहे. या कारणांशिवाय इतर कोणत्याही सबबी देत बदल्या करू नयेत असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी अशाच स्वरूपाचे संकट आले असताना एकूण बदल्यांच्या 15 ते 20 टक्के बदल्यांना मान्यता देण्यात आली होती. पण तूर्तास तरी जूनपर्यंत कोणत्याच बदल्या केल्या जाणार नाहीत. भविष्यात जर कोरोनाचं संकट कमी झालं तर जूननंतर याबाबत नवा अध्यादेश काढत विनंती बदल्या मध्यावधी कालावधीमध्ये करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.