AurangabadCrimeUpdate : खून प्रकरणातील फरार कैदी अखेर एमआयडीसी वाळुज पोलिसांच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : एका खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने हाथकडीसह घाटी रूग्णालयातून धुम ठोकल्याची घटना सोमवारी (दि.३) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली होती. पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळालेल्या शकील शेख आरेफ शेख (रा.कासंबरी दर्गाह परिसर, पडेगाव) याला एमआयडीसी वाळुज पोलिसांनी जोगेश्वरी भागातून हाथकडीसह अटक केली.
पडेगाव परिसरात झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपी शकील शेख हा हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी पोलिस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार पवार हे शकील शेख याला हर्सुल कारागृहातून नियमित तपासणीसाठी घाटी रूग्णालयात घेवून आले होते. घाटी रूग्णालयाच्या ओपीडीमधुन बाहेर पडतांना सहाय्यक फौजदार पवार यांचे लक्ष नसल्याची संधी साधून शकील शेख याने हाथकडीसह धूम ठोकली होती. सहाय्यक फौजदार पवार व त्यांच्या सहकार्यांनी घाटी परिसरात शकील शेख याचा शोध घेतला परंतु ता मिळून न आल्याने या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.