Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोना लाटेचा उद्या पीक पॉईंट : गणितज्ज्ञ प्रोफेसर एम. विद्यासागर

Spread the love

नवी दिल्ली  : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने देशात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना संक्रमित  रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट नेमकी किती काळ राहील याविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येविषयी सरकारचे गणित मॉडेलिंग तज्ज्ञ प्रोफेसर एम. विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची दुसरी लाट 7 मे रोजी शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. देशाच्या आरोग्य क्षेत्राने यासाठी पूर्ण तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रा. विद्यासागर म्हणाले की, या आठवड्यात कोरोना शिगेला पोहचण्याचीच शक्यता आहे. यानंतर कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट नोंदविली जाईल. विशेषत: 7 मे ही कोरोना शिगेला पोहचण्याची गणितीय तारीख आहे. मात्र, प्रत्येक राज्यात परिस्थिती किंचित बदललेली दिसू शकते. प्रत्येक राज्यात कोरोना पीक गाठायची वेळही थोडी वेगळी असू शकते, परंतु संपूर्ण देशात कोरोनाची आकडेवारी जसजशी वाढत आहे, तसतसे कोरानाची लाट शिखरावर आहे किंवा त्याच्या अगदी जवळ आहे, हे निश्चित.

प्रोफेसर विद्यासागर यांनी कोरोनाचे शिखर आणि घट याबद्दल दिलेली माहिती देशासाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. सध्या कोरोनाची दुसरी लाट देशात खूप धोकादायक सिद्ध झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या इतकी झपाट्याने  वाढली आहे की, रुग्णालयात बेडही मिळत नाहीत आणि बेड मिळालेल्यांना ऑक्सिजन पुरवण्यास आरोग्य यंत्रणा  सक्षम नाही.

विद्यासागर म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती समजून घेण्यासाठी सरासरी सात दिवसांच्या कालावधीत कोरोनाची स्थिती पाहण्याची गरज असते. दररोज कोरोनाचे आकडे कमी होत आहेत. परिणामी, आपण फक्त ढोबळमानाने संख्येकडेच पाहू नये तर रोजच्या प्रकरणांच्या सरासरीकडे देखील पाहणे गरजेचे आहे. कोरोनाच्या आकडेवारीवर मी जितके काम केले आहे, त्यावरून मी सांगू शकतो की या आठवड्याच्या शेवटी रुग्णसंख्या कमी होऊ लागेल. मात्र  कोरोनाची शिखरावस्था प्रत्येक राज्यात वेगवेगळी असेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!