Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AuranagabadNewsUpdate लोहगाव शिवारात घर फोडले, ९ तोळे सोन आणि १ लाख रु.रोकड लंपास

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : लोहगाव शिवारात घर फोडून चोरट्यांनी १ लाख रु.रोख व ९ तोळे सोने लंपास केले.या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर इथापे यांच्या  कुटुंबीयांचे लोहगाव शिवारात फार्म हाऊस आहे. ते मुंबई येथे न्यायालयीन सेवेत आहेत. लोहगाव शिवारात त्यांचे थोरले बंधू व आई वडिल यांच्यासह राहतात. गेल्या ३१ डिसेंबरला त्यांचे लग्न झाले आहे. ४ मे रोजी ज्ञानेश्वर यांचे थोरले बंधू गणेश हे पत्नीसह शेतात कामाला गेले होते. तर ज्ञानेश्वर इथापे यांची पत्नी दुपारी शिवारातच मामा राहतात त्यांच्याकडे मुक्कामाला गेली होती. रात्री जेवण करुन गणेश व त्यांची पत्नी गच्चीवर झोपले तर ज्ञानेश्वर यांचे वडील अंगणामधे घराला कुलुप लावून झोपले. पहाटे साडेपाच वा. घरातला लाईट सुरु दिसला म्हणून त्यांनी  घर उघडले तेंव्हा ज्ञानेश्वर यांच्या खोलीतून ९ तोळे सोने व १ लाख रु.रोख लंपास झाल्याचे लक्षात आले.

Advertisements
Advertisements

लवकरच या प्रकरणाचा छडा लाऊ : मोक्षदा पाटील

या प्रकरणी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी लवकरच आम्ही या प्रकरणाचा छडा लावू असा विश्वास व्यक्त केला. पुढील तपास बिडकीन पोलीस करीत आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!