भाजपानेही स्वीकारला पश्चिम बंगालमधील पराभव

तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजपानेही पश्चिम बंगालमधील पराभव स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.
Congratulations to Mamata Didi for @AITCofficial's win in West Bengal. The Centre will continue to extend all possible support to the West Bengal Government to fulfil people’s aspirations and also to overcome the COVID-19 pandemic. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2021
‘पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचं अभिनंदन, केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहील. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि करोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ‘पश्चिम बंगालमधील जनतेचा मी आभारी आहे. त्यांनी आमच्या पक्षाला आशीर्वाद दिला. भाजपाच्या जागा निश्चित वाढल्या आहेत. भाजपा जनतेची सेवा करत राहील. निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मी कार्यकत्यांचे आभार मानतो’, असंही त्याने ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
तसेच सामामध्ये सत्ता भाजपाने दणदणीत घरवापसी केली आहे. केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमत दिले आहे. एलडीएफने ९३ जागांवर आघाडी घेतलेली आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात तामिळनाडूमध्ये लढत बघायला मिळाली. सुरूवातीला दोन्ही आघाड्यांमध्ये अटीतटीची लढत सुरू झाली. मात्र, नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूतील जनतेने द्रमुकच्या पदरात मतं टाकत स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे विजयी
Assembly Election Results 2021 LIVE : अखेर निवडणूक आयोगाने नंदीग्रामचा निकाल केला जाहीर