पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे विजयी

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. त्यामुळे हा पराभव राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. नंतर याचे रुपांतर विजयात झाले आहे. पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके उभे होते, तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले.