WestBengalNewsUpdate : अरेरे !! विजयाची बातमी ऐकण्या आधीच या उमेदवाराला कोरोनाने हिरावले !!

कोलकाता : पश्चिम बंगालमधून त्यातच एक दुःखद बातमी आली आहे. तिथल्या खरदह मतदारसंघात आघाडीवर असलेले TMC नेते काजल सिन्हा यांचं रविवारी सकाळीच कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त आहे. काजल सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी मतदारसंघात उत्साहाने प्रचार केला होता. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते मात्र गेल्या रविवारीच त्यांचे कोरोनामुळे निधन झाले.
दरम्यान आज तकने दिलेल्या बातमीनुसार काजल सिन्हा यांना 21 एप्रिल रोजी कोलकात्याच्या आयडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते . त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 22 एप्रिलला खरदह मतदारसंघात मतदान झाले . त्या दिवशी काजल सिन्हा रुग्णालयातच होते. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रविवारी 25 एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी आघाडी घेतली. ते विजयाच्या अगदी जवळ असल्याचे वृत्त आहे.