#CurrentUpdate | राहुल गांधी यांनाही कोरोनाची बाधा

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. सौम्य लक्षणे आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. नुकतेच राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करा. सुरक्षित राहा”.