मनमोहनसिंग कोरोना पॉझिटिव्ह

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्सच्या ट्रामा सेन्टरमध्ये भर्ती करण्यात आले आहे. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोना व्हायरस लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मनमोहन सिंग यांनी रविवारी कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी सरकारला अनेक सूचना दिल्या होत्या. दरम्यान केंद्र सरकारने त्यांच्या एका सल्ल्यानुसार विदेशी लसींना देशात मागविण्यास मान्यता दिली आहे. सध्या मनमोहन सिंग हे स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पश्चिम बंगालच्या मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते कमलनाथ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी वी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.