AurangabadCrimeUpdate : पोलीस प्रेयसीसह फौजदाराची पत्नीला मारहाण , गुन्हा दाखल , दोघेही निलंबित

औरंगाबाद – देवगाव रंगारीच्या फौजदाराने महिला पोलिस असलेल्या प्रेयसीच्या मदतीने तीन दिवसांपूर्वी स्वत:च्या पत्नीला मारहाण करत घरात डांबून ठेवल्याचा गुन्हा पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या आदेशाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात आज दुपारी ३ वा.दाखल झाला आहे. दरम्यान ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दोघांच्याही निलंबनाचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामीण पोलिस विभागात वाहतूक शाखेत कर्मचारी असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत तिचा पती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो . जो देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असून त्याचे नाव शैलेश जोगदंड आहे. फिर्यादी महिला जोगदंड यांची पत्नी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पती आरोपी जोगदंड प्रेयसी सोबत राहतो. दरम्यान दि . १२ एप्रिलला नाईट ड्यूटी करुन शैलेश जोगदंड सध्या स्नेहनगरातील शासकीय निवासस्थानी मुक्कामी आला. मात्र आपला प्रियकर आपल्याकडे आला नाही म्हणून १३ एप्रिल रोजी सकाळी आरोपी पीएसआय जोगदंड यांच्या घरी त्यांची प्रेयसी आली व दोघांनीही फिर्यादीला पत्नीला मारहाण करून घरातील टि.व्ही. फोडला. आणि जिवंत जाळून टाकीन , चाकूने गळा कापेन अशा धमक्या देत तिला घरात कोंडून ठेवले.
या प्रकरणी वेदांत नगर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.पण फिर्यादी पोलिसआयुक्तांना भेटल्यानंतर मारहाण करीत घरात डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल झाला. तर हि माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या दोघांनाही निलंबित केले . पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे याच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय माटे करंत आहेत