Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशातील कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दीड लाखावर

Spread the love

नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी  एका बाजूला कठोर उपाययोजना केल्या जात असतानाच  दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. त्यासाठी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ कव्हा वापर केला जात असताना आता रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आली आहे. दरम्यान देशातील कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी दीड लाखांच्या पुढे गेलेला दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६१ हजार ७३६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सोमवारी ९७ हजार १६८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर याच २४ तासांत ८७९ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे . याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७१ हजार ०५८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १२ लाख ६४ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना अपडेट 

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३

एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७

उपचार सुरू : १२ लाख ६४ हजार ६९८

एकूण मृत्यू : १ लाख ७१ हजार ०५८

करोना लसीचे डोस दिले गेले : १० कोटी ८५ लाख ३३ हजार ०८५

गेल्या काही दिवसांत संक्रमित रुग्णांची संख्या

१ एप्रिल : ८१ हजार ३९८

२ एप्रिल : ८९ हजार ०२३

३ एप्रिल : ९२ हजार ९९४

४ एप्रिल : १ लाख ०३ हजार ४९४

५ एप्रिल : ९६ हजार ५६३

६ एप्रिल : १ लाख १५ हजार ३१२

७ एप्रिल : १ लाख २६ हजार ७८९

८ एप्रिल : १ लाख ३१ हजार ८७८

९ एप्रिल : १ लाख ४४ हजार ८२९

१० एप्रिल : १ लाख ५२ हजार ८७९

११ एप्रिल : १ लाख ६८ हजार ९१२

१२ एप्रिल : १ लाख ६१ हजार ७३६

गेल्या काही दिवसांतील मृतांची संख्या

१ एप्रिल : ४६८

२ एप्रिल : ७१३

३ एप्रिल : ५१४

४ एप्रिल : ४७७

५ एप्रिल : ४४६

६ एप्रिल : ६३०

७ एप्रिल : ६८५

८ एप्रिल : ८०२

९ एप्रिल : ७७३

१० एप्रिल : ८३९

११ एप्रिल : ९०४

१२ एप्रिल : ८७९

आपलं सरकार

Click to listen highlighted text!