CoronaIndiaUpdate : देशात १,५२,८७९ जणांना कोरोनाची लागण तर आठशेहून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. देशात १,५२,८७९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, कालपर्यंत आठशेपर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
India reports 1,52,879 new #COVID19 cases, 90,584 discharges, and 839 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,33,58,805
Total recoveries: 1,20,81,443
Active cases: 11,08,087
Death toll: 1,69,275Total vaccination: 10,15,95,147 pic.twitter.com/fIaVAfpviB
— ANI (@ANI) April 11, 2021
दरम्यान राज्यात शनिवारी दिवसभरात ५५ हजार ४११ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के इतका आहे. ५३ हजार ००५ रुग्ण करोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.