NagpurFireUpdate : कोवीड हॉस्पिटलला आग , ४ ठार , अनेक जखमी

नागपूर : अमरावती मार्गावरील वाडी नजीकच्या वेल ट्रीट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत चौघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहे. हॉस्पिटलमधील एससीमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मृत कुटुंबियांच्या प्रति आपल्या शोक संवेदना एका ट्विटद्वारे व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. तसेच, या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना तातडीने दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. याचबरोबर, हॉस्पिटमध्ये उपचार घेणाऱ्या ३ ते ४ रुग्णांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सर्व रुग्ण सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली त्या वेळेला रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत होते. अनेक जणांना सुरक्षित सुरक्षित बाहेर हलवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली होती. आग लागली तेव्हा रूग्णालयात 31 रुग्णांवर उपचार सुरु होते. तडकाफडकी उपचार सुरू असलेल्या रुग्णांना खाली आणून इतर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने चार जणांचा या आगीमध्ये मृत्यू झालाय. ही आग कशी लागली याबद्दल अजून स्पष्टता नाही. मात्र आयसीयूमधील विजेच्या उपकरणांचामधून आधी आगीची सुरुवात झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
The loss of lives in a hospital fire at Nagpur in Maharashtra is distressing. I convey my deep sympathies to the bereaved families and pray for the speedy recovery of those injured in this accident.
— President of India (@rashtrapatibhvn) April 9, 2021