IndiaNewsUpdate : अमेरिका – युरोपने कच्चा माल रोखला : अदर पुनावाला

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असतानाच करोना लसीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा देखील तुटवडा जाणवत असल्याचा नवा प्रश्न समोर येतो आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कोविशिल्ड’ या करोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक अदर पुनावाला यांनी कच्च्या मालाचा तुटवडा भासत असल्याची समस्या व्यक्त केली आहे.
भारतात करोना लस तयार करण्यासाठी अमेरिका आणि युरोपमधून कच्चा माल येतो. मात्र, या देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याचं अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करोना लस कशी निर्माण करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. त्यामुळे देशात करोना लसीकरण मोहिमेचा वेग त्यामुळे आणखीनच मंदावण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे वृत्त आहे.