CoronaIndiaUpdate : देशात कोरोनाची भयावह आकडेवारी , ६२,७१४ नवीन रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ६२,७१४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ३१२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांचा आकडा आता १,६१,५५२ इतका झाला आहे. तर देशाता आता अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ४,८६,३१० इतकी झाली आहे. शनिवारी ही संख्या ४,५२,६४७ इतकी होती. १,१३,२३,७६२ जण करोनातून मुक्त झाले आहेत.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे ५ राज्यांमध्ये आहेत. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, पंजाब आणि गुजरातचा समावेश आहे. महाराष्ट्रात ३५७२६, कर्नाटकमध्ये २८८६, छत्तीसगडमध्ये ३१६२, पंजाब २८०५ आणि गुजरातमध्ये २२७६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक १६६, पंजाबमध्ये ४५, केरळमध्ये १४, छत्तीसगडमध्ये १३ आणि दिल्लीत १० जणांना करोनाने मृत्यू झाला आहे.
India reports 62,714 new #COVID19 cases, 28,739 discharges, and 312 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 1,19,71,624
Total recoveries: 1,13,23762
Active cases: 4,86,310
Death toll: 1,61,552Total vaccination: 6,02,69,782 pic.twitter.com/RWD288fXEz
— ANI (@ANI) March 28, 2021
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुसरीकडे लसीकरण मोहीमही वेगात सुरू आहे. आतापर्यंत लसीकरणाने ६ कोटींचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांच २१५४१७० लसीचे डोस दिले गेले. देशात करोनाने परिस्थिती अधिक चिंतेची बनत चालली आहे. देशात गेल्याकाही दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्याही ५० हजारांवर आढळून येत होती. आता ही संख्या ६० हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांतील कोरोनाची आकडेवारी समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने रविवारी जे आकडे जाहीर केलेत त्यानुसार गेल्या २४ तासांत सलग १८ व्या दिवशीही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर १६ ऑक्टोबर २०२० नंतर देशातील ही नवीन रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. तर तीन महिन्यांत करोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. यापूर्वी २५ डिसेंबर २०२० मध्ये एका दिवसात करोनाने ३३६ जणांचा मृत्यू झाला होता. १६ ऑक्टोबरला करोनाचे ६३,३७१ नवीन रुग्ण आढळून आले होते.