Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : माझ्यावरील आरोप निराधार , दूध का दूध आणि पानी का पानी करा , गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

मुंबई :   मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्यामुळे नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपाची चौकशी करावी असे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आणि सचिन वाझे याने हप्ता वसुलीचा कबुली जबाब एनआयएला दिल्यामुळे देशमुख अडचणीत आले आहेत परंतु आपल्यावरील हे आरोप निराधार असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे पत्रात म्हटले आहे.


दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुखांनीसचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचे  टार्गेट दिले  होते , असा आरोप परमबीर सिंग यांनी केला, या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, यात आता अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे, या पत्रात म्हटले आहे कि ,  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुधका दुध, पानीका पानी करावं अशी मागणी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा 

सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांच्या पत्रावरून विरोधकांकडून सातत्याने  ठाकरे सरकारवर हल्ले होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचे आरोप खोडून त्यांना उघडे   पाडायला हवे . विरोधकांवर तुटून पडायला असे  मुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीत म्हणाले. सर्वांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी पुढे म्हटले . याला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी देखील दुजोरा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणे  नोंदवली. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडतोय का? त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? अधिकारी फोन टॅप करणार असतील, तर मग मंत्र्यांनी कामी  कशी करायची? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!