Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्यांची विवाहित प्रेयसीच्या घरी आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – दौलताबाद येथील ग्रामपंचायत सदस्य सुनिल खजिनदार (३७) यांनी आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी दुपारी ३ वा बंद खोलित गळफास घेतला ही घटना संध्याकाळी सात च्या सुमारास उघडकीस आली अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत खजिनदार यांची संबंधीत महिलेशी लहानपणापासून मैत्री होती मात्र तिच्या  लग्नानंतर खजिनदार यांची तिच्याशी नेहमी खडाजंगी होत असे या भांडणाची माहिती खजिनदार यांच्या प्रेयसीचा  पती आणि मुलांना माहिती होती. दरम्यान खजिनदार हे तिचा  पती आणि मुलं घरी नसतांना गेला होता. दोघांचे भांडण झाले. खजिनदार यांनी प्रेयसीच्या  घरातील एका खोलित स्वतःला कोंडून घेतले म्हणून ती बाहेरुन कुलुप लावून घराबाहेर थांबली होती. संध्याकाळी सहा वा. तिने खजिनदार यांना आवाज दिला पण प्रतिसाद न आल्यामुळे तिने परिसरातील नागरिकांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून खजिनदार यांचा मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली दौलताबाद पोलिस करीत आहेत

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!