प्रवाशांनी मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले तर होणार विमान प्रवास बंद

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने डीजीसीएने नवीन मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. प्रवासादरम्यान जर तुम्ही मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही स्वरुपाची चूक केली तर तुमच्या विरोधात डायरेक्ट्रेड जनरल आॅफ सिव्हील एव्हिएशन (डीजीसीएने) कडक कारवाई करणार असून, जर सातत्याने प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायमस्वरुपी विमान प्रवास बंदी घातली जाऊ शकते.
डीजीसीएने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एअरपोर्टवर दाखल झाल्यापासून ते तेथून बाहेर पडेपर्यंत मास्क लावणे अनिवार्य आहे. विमान प्रवासादरम्यान जे प्रवासी सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांना विमानातून उतरवले जाईल. तसेच जे प्रवासी वारंवार नियमांचे उल्लंघन करतील त्यांना उपद्रवी प्रवासी म्हणून घोषित केले जाईल.
डीजीसीएने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना
- विमान प्रवासादरम्यान मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
- अपवादात्मक स्थिती व्यतरिक्त मास्क नाकाखाली आणता येणार नाही.
- विमानतळावर प्रवासी प्रवेश करताना सीआयएसएफ (CISF) किंवा पोलिस कर्मचारी मास्क न लावता आत येऊ शकणार नाहीत.
- विमानतळ संचालक किंवा टर्मिनल व्यवस्थापक हे प्रवाश्यांनी मास्क व्यवस्थित लावला आहे की नाही, प्रवाश्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जातय
- की नाही यावर लक्ष ठेवतील.
- विमानतळ परिसर किंवा विमानात जर कोणाताही प्रवासी नियमांचे पालन करत नसेल तर त्यास इशारा देऊन सोडून देण्यात येईल. परंतु, कायद्यानुसार
- कारवाई करण्याचा उल्लेख या परिपत्रकात आहेत.
- उड्डाणापूर्वी विमानात बसलेला कोणताही प्रवासी इशारा देऊनही मास्क नीट लावत नसेल तर त्यास विमानातून उतरुन देण्यात येईल.
- विमान प्रवासात एखादा प्रवासी सातत्याने मास्क वापरण्यास नकार देत असेल आणि कोविड नियमांचे पालन करत नसेल तर त्यास उपद्रवी प्रवाश्याप्रमाणे वागणूक दिली जाईल.
- उपद्रवी प्रवासी यादीतील प्रवाश्यांना विमान प्रवासास बंदी केली जाईल. नव्या नियमांनुसार ही बंदी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल.