Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : मोबाईल खेळणार्‍या मुलीला आई रागावल्याने तिने घेतला गळफास

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद- मोबाईल खेळायचा सोडून घरातले कामं करंत जा असे मुलीला रागावल्यामुळे चिडलेल्या १४वर्षाच्या मुलीने सोमवारी रात्री ८वा. साडीने गळफास घेत आत्महत्या केली.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपाली एकनाथ घेणे (१४) रा आनंदनगर गल्ली नंबर १६गारखेडा असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

Advertisements

दिपाली ने काल रात्री ८वा.गळफास घेतल्या नंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्यानंतर मुलीच्या आई वडलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातही गोष्ट उघडकीस आली. पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस करंत आहेत.

Advertisements
Advertisements

याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली ही एकुलती मुलगी आहें. तिचे पालक हे बाजारात जाऊन फरसाण विक्रीचा व्यापार करतात. सोमवारी तिचे वडील सकाळी बाजारात गेले होते. त्यानंतर तिच्या आईने दोन मुले व दीपाली यांना पोहे बनून दिले. पतीचा हातभार लावण्यासाठी आई देखील रात्री दहा वाजता   बाजारात गेली. घरात लहान भाऊ असतांना दिपालीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन छताच्या लोखंडी गजाला साडी बांधून गळफास घेतला. ते रात्री परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी बेशुद्ध अवस्तेत दीपालीला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री अकरा वाजता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!