IndiaNewsUpdate : नरेंद्र मोदी हे घाबरट, राहुल गांधींचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरट असून ते चीनच्या पुढे टिकू शकले नाहीत. आपल्या सैन्याच्या बलिदानाचा ते अपमान करत आहेत. देशात कुणालाही असे करण्याची परवानगी देता कामा नये. या देशाचे संरक्षण करणे हे पंतप्रधानांची जबाबदारी आहे. ते संरक्षण कसे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही.” अशा शब्दात काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जमिनीचा भाग चीनला दिला, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) वरुन सैन्य मागे घेण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हि पत्रकार परिषद घेतली.
Yesterday, Defence Min made a statement on the situation in Eastern Ladakh. Now, we find our troops are now going to be stationed at Finger 3. Finger 4 is our territory. Now, we've moved from Finger 4 to Finger3. Why has Mr Modi given up our territory to the Chinese: Rahul Gandhi pic.twitter.com/4KmqnQU2Zd
— ANI (@ANI) February 12, 2021
राहुल गांधी म्हणाले ,कि भारताची जागा फिंगर 4 वर आहे, तर भारतीय लष्कर फिंगर 3 वर का आले? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. ‘पंतप्रधानांनी फिंगर 4 चीनला का दिलं? आपल्या सैनिकांनी कैलास रेंजवर ताबा मिळवला होता. मात्र ते आता तिथून मागे येत आहेत, हे असं का होत आहे? नरेंद्र मोदी यांनी चीनपुढे शरणागती पत्कारली आहे,’ असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी भारत-चीन प्रश्नावर संसदेत वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत त्यांच्यावरही टीका केली. देपसांगबद्दल संरक्षणमंत्र्यांनी काहीही सांगितलं नाही. त्याचबरोबर गोगरा आणि हॉटस्प्रिंगबद्दलही ते काही बोलले नाहीत. चीनने त्या भागावर ताबा मिळवला आहे, असा दावाही गांधी यांनी केला.