कृषी कायद्यावर पंतप्रधान ठाम !! एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा मोदींचा प्रयत्न

पंतप्रधान सोमवारी राज्यसभेत काय बोलणार ? याचे उत्तर विरोधकांना आणि आंदोलक शेतकऱ्यांना दिले आहे. या भाषणात त्यांनी विरोधकांना कानपिचक्या देण्याची एकही संधी न सोडता , शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावे. एकत्रित बसून चर्चा करता येईल, असे आवाहन केले. शिवाय त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत शार पवार यांच्यावरही तोफ डागण्याचा प्रयत्न केल.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला. यावेळी शेतकरी, आंदोलन तसेच देशातील इतर मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. दरम्यान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून झालेल्या गदारोळामुळे कुठलीही चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील अभिभाषणावर होते.
शरद पवारांचा विषय…
कृषी कायद्यावर भाष्य करताना ते म्हणाले कि ‘शरद पवार यांनी शेती कायदे सुधार करण्यासाठी प्रयत्न केले. शरद पवार यांनी शेती कायद्यात सुधार करण्याचे मत व्यक्त केले होते. परंतु, त्यांनी कायद्याला विरोध केला नाही. आज आम्ही चांगले विचार मांडले याचा अर्थ असा नाही की १० वर्षानंतर चांगले विचार असू शकत नाही. पंरतु, अचानक यू-टर्न का घेतला हे मात्र कळू शकले नाही. तु्म्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकता की, नवीन कायदे आहे ते स्वीकारले पाहिजे’ असा टोला मोदींनी शरद पवारांना लगावला.
ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले कि , ‘आम्ही छोट्या शेतकऱ्यांसाठी ९० हजार कोटींचा फायदा मिळवून दिला आहे, हा आकडा कर्जमाफीपेक्षा सुद्धा जास्त आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना फायदा मिळवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचे ठरवले आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा थेट फायदा झाला आहे. तसेच १० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात किसान जीवन विमा योजनेतून थेट पैसे जमा केले आहे. बंगालमध्ये राजकारण झाले नसते तर तेथील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले असते, असं म्हणत मोदींनी ममतादीदींवर निशाणा साधला.
एमएसपी होता, आहे आणि भविष्यातही राहील.
बाजार समित्यांचे आधुनिकीकरण
बाजार समित्यांच्या विषावर बोलताना मोदी म्हणाले कि , देशात एमएसपी व्यवस्था होती, आहे आणि कायम राहील असे आश्वासनही मोदींना शेतकऱ्यांना वरिष्ठ सभागृहातून दिले. शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते, सर्व सरकारांनी शेती सुधारणांचा प्रयत्न केला. सर्वांनी त्यांच्याकाळात याचे समर्थन केले आहे. पंरतु, देशात एमएसपी होते, आहे आणि भविष्यातही राहील. गरीबांना माफक दरात शिधा मिळत राहील तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण केले जाईल.
आता काही लोकं ‘आंदोलनजीवी’ झाले
आम्ही ‘बुद्धीजीवी’ हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं ‘आंदोलनजीवी’ झाले आहेत. देशात काहीही झाले की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून वाचायला हवे ,”जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचे आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही,” असंही मोदी म्हणाले.
राज्यसभेत बोलताना मोदी पुढे म्हणाले, ‘सभागृहात शेतकरी आंदोलनावर खूप चर्चा झाली. विरोधक मूळ मुद्द्यावर गप्प आहेत. जास्तीत जास्त वेळी जे मुद्दे मांडले गेले, ते आंदोलनाचे आहेत. पण, कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे, यावर मात्र सर्वजण गप्प आहेत. कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी आहेत. पण, मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगले झाले असते. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे.’
आपल्याला एकदा पाहावे लागेल की, कृषी परिवर्तनाने सुधारणा होते की नाही. जर काही उणीवा असतील तर ते ठिक करू, कोणतीही कमी असेल तर ती भरून काढू.