“राहुल गांधी कायर आणि नपुंसक” : भाजप नेत्याची पातळी सोडून असभ्य भाषेत टीका

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी संपूर्ण देशभर सुरू झाली आहे. काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये आरोप व प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत . काही नेत्यांनी सभ्यतेची पातळी सोडून टीका करण्यास सुरुवात केली आहे. हरयाणवी अभिनेत्री सपना चौधरींच्या काँग्रेस प्रवेशावरून एका भाजप नेत्याने सोनिया गांधी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर केलेली टीका गाजत असतानाच भाजपचे नेते आणि उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री चौकीदार श्रीकांत शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कायर आणि नपुंसक म्हटले आहे.
शर्मा यांनी ट्विटरवरून राहुल गांधी यांच्यावर अत्यंत असभ्य भाषेत टीका केली आहे. ‘घाबरट नपुंसक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या इशाऱ्यावर वाचाळवीर लाजिरवाणी वक्तव्य करत आहेत. संपूर्ण जग दहशतवादा विरोधात भाजप सरकारच्या कारवाईसोबत आहे. मात्र काँग्रेस नेत्यांची घटिया वादग्रस्त वक्तव्य दहशतवादाविरोधात हिंदुस्थानची लढाई कमजोर करत आहे’, अशी टीका श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.
याला काँग्रेसचेसहयोगीजनतादलानेभाषेत उत्तरदिलेअसूनत्यांनीट्विटकेलेआहेकि, ‘राहुल गांधी नपुंसक आहे आणि नरेंद्र मोदी नाही , हे यांना कसे माहित झाले ? देश जानना चाहेगा! जेंव्हा त्यांच्या नेत्यांचीच भाषा इतकी अभद्र आहे, त्यांचे स्वतःचे रिकॉर्ड इतके विवादास्पद आहे आणि रक्ताने लथपथ आहे त्यांच्याकडून आणखी कुठल्या सबाह्य भाषेची अपेक्षा ठेवता येईल . अशी अपेक्षा ठेवणेसुद्धा मूर्खपणा ठरेल .