भंगार वाहनातून ग्रामीण पोलिसांनी केली लाखोंची कमाई ३८३ वाहनांचा लिलाव, ४२ वाहने मुळ मालकाला सुपूर्द

औरंंगाबाद : ग्रामीण भागातील विविध पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून भंगार वाहने धूळ खात पडून होती. जिल्ह्यातल्या २३ ठाण्यातील भंगार दुचाकींची तातडीने निर्गती करण्यात यावी म्हणून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते॰ त्या अनुषंगाने ४२७ बेवारस तेसच विविध गुन्ह्यातील जप्त वाहनां पैकी ४२ वाहने मुळ मालकांना परत करण्यात आली तर उर्वरित ३८३ वाहनांचा लिलाव करून त्यातून १६ लाख ८९ हजाराची कमाई केली आहे॰
पोलिस ठाण्यात अनेक वेळा चोरीच्या तसेच बेवारस दुचाकी जमा करण्यात येतात. यांच्या मालकाचा शोध घेत त्यांना ही वाहने दिला जातात. ज्या दुचाकींच्या मालकाचा शोध लागत नाही अशा दुचाकी वर्षानुवर्षे भंगारात पडून असतात. जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यात पडून असलेल्या दुचाकींच्या लिलावाची प्रक्रिया पारपाडून॰ या भंगार दुचाकींचा लिलाव घेतला. अनेक पोलीस ठाण्यांना हक्काचा मोकळा भूखंड उपलब्ध नसल्याने पोलीस ठाण्याबाहेर व परिसरात विविध गुन्ह्याखाली जप्त केलेली वाहने सांभाळणे सर्वच पोलीस ठाण्यांना डोकेदुखी ठरत होती. अनेक पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तरतुदीनुसार केला जात आहे. या प्रक्रियेत पहिली नोटीस संबंधित वाहन मालकाला देण्यात येते व त्यानंतर वाहनाची विल्हेवाट लावण्यात येते.