” क्या वो “सपना”था , जो टुट गया …!! सपनाच्या काँग्रेस प्रवेशावरून भाजपकडून टीकेची पातळी घसरली , काँग्रेस ने जाहीर केला पुरावा

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बीग बॉस फेम सपना चौधरी हिने शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त शनिवारपासून येत आहे. यावर भाजपाचे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार सुरेंद्र सिंह यांनी सोनिया गांधींवर वादग्रस्त टीका केली आहे. सोनियांचा पेशाही तोच होता, त्यामुळे सूनही बनवा, असे म्हटल्याने नवा वाद ओढवला आहे. तर सपना चौधरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे वृत्त फेटाळल्याने काँग्रेसनेच सदस्यत्वाचा अर्ज भरतानाचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपासह काँग्रेसमध्येही प्रसिद्ध व्यक्तींना पक्ष प्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्यात येत आहे. भाजपाने नुकतेच दिल्लीचा क्रिकेटपटू गौतम गंभीरला प्रवेश दिला आहे. काँग्रेसने काल हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बीग बॉस फेम सपना चौधरी हिला पक्षात घेतल्याचे वृत्त पसरले होते. सपना चौधरी या प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालीनी यांच्या विरोधात मथुरा लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सपना चौधरी यांनी आज यावर खुलासा केला असून आपण काँग्रेसमध्ये प्रवेशच केला नसल्याचे म्हटले आहे.
भाजपने टीका करताना सोडली पातळी..
या सपना चौधरी यांच्या प्रवेशावर भाजपाचे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार सुरेंद्र सिंह यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांची आईदेखील इटलीमध्ये याच पेशात होती. जसे तुमच्या वडिलांनी सोनियांना आपले बनविले होते, तुम्हीही सपनाला तुमचे बनवा. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सासू आणि सून एकाच पेशाची आणि संस्कारांच्या आहेत.
दरम्यान, आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला नसून प्रियंका गांधी यांच्या सोबतचा ते फोटो जुने आहेत. मी कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाणार नाही, असा खुलासा सपना चौधरी यांनी केला आहे. यावर काँग्रेसने सपना चौधरींचा दावा खोडून काढताना त्यांचे पक्षाच्या सदस्यत्वाचा अर्ज भरतानाचे, अर्जा चे आणि पावती भरल्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.