महिलेची गळफास घेवून आत्महत्या

औरंंगाबाद : पडेगाव-मिटमिटा परिसरातील कासलीवाल तारांगण येथे राहणाऱ्या १९ वर्षीय महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. मोनाली गोविंद पठाडे (वय १९, रा.फ्लॅट क्रमांक ११, एफ-४, कासलीवाल तारांगण,) असे गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मोनाली पठाडे यांनी फ्लॅटच्या दरवाज्याला आतमधुन कडी लावून फॅनला दोरीच्या सहाय्याने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी मोनाली पठाडे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मोनाली पठाडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले.