मालकाला उद्धट बोलल्याने चालकाने थेट पिस्टल काढून केला गोळीबार,

A controversial program which can turn your iphone into a fake gun ....
- भंगार व्यवसायिक अटकेत, तीन दिवसांपूर्वी मुंबई वरून आणलेली कार रस्त्यावर उभी करण्यावरून वाद
- हल्ल्यानंतर हर्सूलला नातेवाईकाच्या घरा समोर कार सोडून पळून गेला
भंगार व्यवसायातून सुरू असलेला वाद रस्त्याबर वाहने उभे करण्यापर्यंत पोहोचला व त्यातून गोळीबार करून खुनाच्या प्रयत्नाची घटना बुढिलेन मध्ये गुरुवारी रात्री बारा वाजता घडली. यात भंगार व्यापारी शेख मेहबूब अहमद उर्फ राजाभाई याला अटक करण्यात आली. मात्र, गोळी करणारा त्याचा चालक अक्रम खान शेर खान हा फरार झाला आहे.
बुढिलेन मध्ये राजाभाई मेहबूब नावाचा भंगार व्यवसायिक आहे. बुढिलेन मध्ये मनपा कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक भंगार व्यवसायिकांचे गोडाऊन आहे. त्याच भागात गोळीबारात जखमी झालेला अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार (२५, रा. बुढिलेन) हे त्याच्या भाऊ रजाक यांचे घर आहे. राजाभाई च्या गोडाऊन चे बहुतांश साहित्य तिथे मोकळ्या जागेवर पडलेले असल्याने त्यांच्या घराकडे जाण्यात अडचन निर्माण होत होती. गुरुवारी रात्री रज्जाक घरी जात असताना राजभाई ची कार रस्त्यात उभी होती. रज्जाक ने त्यावर आक्षेप घेतला. त्यावर राजाभाई ने, तूम्हि घरी जायला दुसरा रस्ता वापर , असे म्हणाला. तेव्हा जब्बार ने वाद घालू नको म्हणताच राजभाई ने त्याच्या कार मध्ये बसलेल्या त्याच्या चालक अक्रम ला काहीतरी सांगितले आणि अक्रम खाली उतरला आणि थेट पीस्टल ने तीन गोळ्या झाडल्या. यात एक गोळी अक्रम च्या पायाला लागली व तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनेच्या काही वेळा नंतर राजाभाई ला ताब्यात घेण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून अक्रम (राजाभाई चा चालक) याने तीन दिवसांपूर्वी मुंबई वरून सेकंड हॅन्ड कार खरेदी केली होती. त्यांनी पिस्टल कुठून आणली, याचा उलगडा होऊ शकला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी च विशेष शाखेने होणाऱ्या वादा मुळे भंगारव्यवसायिकांची बैठक घेतली होती. त्यात प्रत्येक भंगार व्यापाऱ्याने त्याची, त्याच्याकडे काम करणाऱ्यांची, जागेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्याचे बंधनकारक केले होते. त्या नंतर एका भंगार व्यापर्याकडेच पिस्टल निघाले व त्यातून बुढिलेन मध्ये तणाव निर्मन झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.