अधिकाऱ्याने दिले दिल्लीतील बॉम्बस्फोटा मागचे हे कारण…

मध्य दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. या ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी पोहोचली असून. दिल्लीचे पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव म्हणाले कि, राजेश पायसट मार्क येथे हा स्फोट झाला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे.
इस्त्रायली दूतावासापासून 150 मीटर अंतरावर एक गाडी उभी होती आणि त्याच ठिकाणी हा स्फोट झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 वाजून 45 मिनिटांनी हा आईईडी स्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटाची तीव्रता फारच कमी होती. बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला असून यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेल्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित असलेल्या विजय चौकवर सैन्याचा ‘बिटिंग रिट्रिट’ सोहळा सुरू असतानाच हा बॉम्बस्फोट घडला. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले आहे. तसेच, गृहमंत्री अमित शाहदेखील दिल्ली पोलिसांशी सातत्याने संपर्कात असून घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
A low-intensity explosion happened near the Israel Embassy in Delhi, nature of explosion being ascertained. Some broken glasses at spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/xqIllrCZOQ
— ANI (@ANI) January 29, 2021
हा स्फोट खळबळ उडवण्यासाठी केला असेल…
बॉम्बस्फोटाबाबत अधिक माहिती म्हणजे, आईईडीच्या स्वरुपातील ही स्फोटके प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर ठेवलेली होती. स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या चार ते पाच गाडयांच्या काचा फुटल्या. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर व्यापला होता. फायर कारनेही जाऊ दिले नाही. औरंगजेब रोडवर बॉम्बचा स्फोट झाला होता, असे अग्निशमन नियंत्रण कक्षाला 6 वाजता फोन आला. हा फोन येताच घटनास्थळावर कॅनॉट प्लेस येथील अग्निशमन केंद्रातून तीन वाहने पाठविली गेली. घटनास्थळी दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राईलचे दूतावास आहे. संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त पीआरओ अनिल मित्तल म्हणाले की, प्राथमिक तपासणीतून असे दिसते की, एखाद्याने खळबळ उडवण्यासाठी हा बॉम्बस्फोट केला असेल.
आज भारत आणि इस्रायल देखील त्यांच्या राजनैतिक संबंधांचा 29 वा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. याबाबत इस्त्रायली दूतावासानेही ट्विट केले आहे. २०१२ साली फेब्रुवारी महिन्यात इस्त्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या कारला लक्ष्य करण्यात आले होते आणि बॉम्बस्फोट घडवून आणला होता. आज दिल्लीतील औरंगजेब मार्गावरील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटामुळे दिल्ली पोलिसांत खळबळ उडाली आहे. या परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर बीटिंग रिट्रीट सोहळा चालू असताना स्फोट झाला होता, जिथे अनेक व्हीआयपी उपस्थित असतात.
मुंबई हाय अलर्टवर, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस सुरक्षेत वाढ, मुंबई एअरपोर्टवर हाय अलर्टवर, मुंबईस्थित इस्त्राईल अॅम्बेसीच्या सुरक्षेत वाढ
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले. राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहान त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच सावधगिरी म्हणून दिल्ली विमानतळ, सरकारी इमारती आणि महत्वाच्या ठिकाणी अलर्ट जरी करून सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सीआयएसएफने दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील करी रोड येथील फ्युचरेक्स मॅरॅथॉन इमारतीत कॉन्सुलेट जनरल ऑफ इस्राईलचे कार्यालय असून तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हे कार्यालय एन. एम जोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.