लाहोरला आजोळी गेलेल्या वृध्देला पाकिस्तानने भारतीय जासूस म्हणून १८ वर्षे कारागृहात डांबले,सिटीचौक पोलिसांच्या मदतीने भारतात परतल्या

जगदीश कस्तुरे । महानायक वृत्त सेवा । औरंगाबाद
औरंगाबाद : १८वर्षांपूर्वी औरंगाबादहून लाहोरला आजोळी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले रशीदपुर्यातील हसीना बेगम (६५) यांचे पासपोर्ट हरवल्याने त्यांना भारतात परतता आले नाही. यांना लाहोर पोलिसांनी लजपथ कारागृहात भारतीय जासूस म्हणून १८वर्षे डांबून ठेवले होते. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर मंगळवारी (26 जानेवारी) त्या भारतात परतल्या.
औरंगाबादच्या सिटी चौक स्टेशन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसीना बेगम यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. आपण निर्दोष असल्याचे हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. सव्वा वर्षापूर्वी हा प्रकार भारतीय दूतावासाकडून औरंगाबाद पोलिसांना कळताच त्यांनी हसीना यांचा भाचा जैनूद्दीन चिश्ती यांना कळवले. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती चिश्ती यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन पोलिसांना दिल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी ही माहिती पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी स्वता: लक्ष देत हसीना यांना त्यांच्या कुटुंबियांच्या सूपूर्द केले.
मायदेशी परतल्यानंतर मला मला वाटतंय की मी स्वर्गात आहे.
आजही लाहोर च्या त्यांच्या आजोळी हसीना कारागृहात शिक्षा भोगत होत्या याची पुसटशीही कल्पना नाही. हे सांगतांना हसीना भावनाविवश होत होत्या. मायदेशी परतल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. “मी अनेक अडचणींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे. मला वाटतंय की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने कैद करण्यात आलं आहे. या प्रकरणात अहवाल सादर करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे मी आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी भारतात परतल्यावर दिली.
पोलिसनिरीक्षक आणि त्यांच्या टीमचे आभार
हसीना बेगम ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांच्या सख्या मावशी आहेत. उत्तरप्रदेशातील सहारणपूर हे त्यांचे सासर आहे. पती पासून विभक्त झाल्यानंतर त्या औरंगाबादेत राहात होत्या. हसीना बेगम यांनी जैन्नूद्दीन याला मुलगा म्हणून सांभाळले. २००४ साली त्या रेल्वेमार्गे लाहोर ला पोहोचल्या होत्या. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर मंगळवारी (26 जानेवारी) त्या पोलिसांसोबंत नांदेड पर्यंत विमानाने व तेथून रेल्वेने शहरात परतल्या. मायदेशी परतल्यानंतर त्यांचे अश्रू अजूनही त्यांना समोरच्या शी संवाद साधू देत नाहीत. लजपथ कारागृहातील एकेक अनुभव त्या हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करंत आहेत. या वेळी जैनूद्दीन चिश्ती यांनी पोलिसनिरीक्षक संभाजी पवार आणि त्यांच्या टीम बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.