Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बसचालकाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाची पोलिस कोठडीत रवानगी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद :  सिटी बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणात पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून जफर खान सत्तार खान (वय २८, रा. कैसर पार्क, नारेगांव) असे त्या रिक्षाचालकाचे नाव असून त्याला गुरूवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रिक्षाचालकाचे तीन साथीदार फरार आहेत.

Advertisements

रविवारी सकाळी मुकुंदवाडीतून रांजणगांवकडे जाणारी सिटीबस सिडको बसस्थानकात जात होती. त्यावेळी बसस्थानकाच्या प्रवेश द्वारासमोर सिटी बसचालक समाधान वानखेडे याचा रिक्षाचालकासोबत वाद झाला होता. त्यावेळी रिक्षाचालक जफर खान सत्तार खान याने आपल्या साथीदारांच्या मदतीने बसचालक वानखेडे याला शिवीगाळ करून माहराण केली होती. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी रिक्षाचालक जफर खान याला अटक केली. त्याचे तीन साथीदार फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संजय मांन्टे करीत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!