MaharashtraNewsUpdate : राज्यात ३ हजार १५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद , ५९ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात ४ हजार ५८९ जणांनी कोरोनावर मात केली. तर, ३ हजार १५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, ५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ९७ हजार ९९२ वर पोहचली आहे. सध्या देशात ४६ हजार ७६९ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १८ लाख ९९ हजार ४२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ५० हजार ५८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यात आज 3015 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4589 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1899428 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 46769 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.07% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 20, 2021
Maharashtra reports 3,015 new #COVID19 cases, 4,589 discharges, and 59 deaths today
Total cases – 19,97,992
Total recoveries – 18,99,428
Death toll – 50,582Active cases – 46,769 pic.twitter.com/uZT6DH4nbW
— ANI (@ANI) January 20, 2021
दरम्यान, राज्याती रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९५.७ टक्क्यांवर पोहचले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपर्यंत १,३९,५७,४६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी १९ लाख ९७ हजार ९९२ (१४.३१ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ३२५ जण गृहविलगीकरणात असून, २ हजार २३० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
पुणे शहरात दिवसभरात ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले असून, सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहारातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ८३ हजार ७८७ वर पोहचली आहे. तर ४ हजार ७२० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ३५३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ७६ हजार ८१२ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, स्तनदा माता, गर्भवती महिला व ताप असलेल्या व्यक्ती यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये, असा सल्लावजा इशारा भारत बायोटेक या कंपनीने दिला आहे. कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादेतील या कंपनीने तयार केली असून तिला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांआधीच मान्यता देण्यात आली होती.